पुणे : यंदा गाळप तीन महिने; 60 कारखान्यांना ऊस गाळपाचे परवाने वितरित | पुढारी

पुणे : यंदा गाळप तीन महिने; 60 कारखान्यांना ऊस गाळपाचे परवाने वितरित

पुणे; पुढारी वृत्तसेवा : साखर आयुक्तालयाने यंदाच्या 2023-24 च्या हंगामात गुरुवारअखेर एकूण 60 साखर कारखान्यांना ऊस गाळपाचे परवाने वितरित केले आहेत. हंगामात प्रत्यक्षात गाळपासाठी 921 लाख टन ऊस उपलब्ध असून परवान्यासाठी प्रस्ताव प्राप्त 217 साखर कारखान्यांची दैनिक ऊस गाळप क्षमता 9.57 लाख टनाइतकी आहे. याचा विचार करता तीन महिन्यांचा म्हणजेच जानेवारी महिनाअखेर हंगाम चालण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सद्यस्थितीत यंदाच्या हंगााख हेक्टर क्षेत्रावर ऊस पीक उभे आहे. गाळपासाठी एकूण उसाची उपलब्धता 1 हजार 22 लाख टनाइतकी आहे. प्रत्यक्षात नव्वद टक्के ऊस गाळपास उपलब्ध होईल. एकूण 921 लाख टन ऊस गाळपातून इथेनॉल उत्पादनाकडे 15 लाख टन साखर जाईल आणि निव्वळ साखरेचे उत्पादन 88.58 लाख टन होण्याचा साखर आयुक्तालयाचा प्राथमिक अंदाज आहे.

स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची आर्थिक वर्ष 2021-22 मधील प्रति टन निर्धारित केलेली 7 रुपयांपैकी 3 रुपये, एफआरपीची रक्कम आणि अन्य निधी कपात कारखान्यांनी दिलेली आहे. अशा कारखान्यांच्या परिपूर्ण प्रस्तावांना यंदाचे ऊस गाळप परवाने वितरित करण्यात आलेले आहेत. आणखी 20 कारखान्यांना शुक्रवारी परवाने ऑनलाईनद्वारे वितरित करण्यात येणार असल्याची माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली.

दिवाळीनंतर गती वाढणार…

ऊस तोडणीसाठी बहुतांशी कारखान्यांच्या परिसरात ऊस तोडणी टोळ्या दाखल झालेल्या आहेत. असे असले तरी प्रत्यक्षात दिवाळीच्या सणानंतर खर्‍या अर्थाने ऊस गाळप हंगाम जोर पकडण्याचा अंदाज आहे. त्यावेळी 217 पैकी प्रत्यक्षात किती कारखाने सुरु होतील, त्यानुसार दैनिक ऊस गाळप क्षमतेचा वापर वाढणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा

फ्रान्समध्ये सापडला सफेद हायड्रोजनचा खजिना

पुणे : लेखापरीक्षकांचा बहिष्कार सकारात्मक चर्चेनंतर मागे

सांगली : अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा मुहूर्त पुन्हा हुकला

Back to top button