माघी एकादशी निमित्‍त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची आरास

Published on
Updated on

पंढरपूर :  पुढारी वृत्त सेवा

आज (मंगळवार) माघी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. त्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विविध पाना- फुलांनी श्रीं चा गाभारा व संपूर्ण मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे. मंदिरावरही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जरी प्रतिनिधीक स्वरूपात माघ वारी जया एकादशी साजरी होत असली तरी मंदिर समितीकडून परंपरा जपली जात आहे. त्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा व मंदिर विविध फुलांनी सजविण्यात आले आहे. याकरिता झेंडू, शेवंती, ग्लाडीओ, ऑरकेड, ब्लू डी जे, संगोप ड्रेसिना आदी फुलांचा वापर करण्यात आला आहे. या करिता सुमारे 1 टन वजनाची  50 हजार रुपयांची फुले वापरण्यात आली आहेत. विठ्ठल भक्त सचिन चव्हाण, संदीप पोकळे- पाटील, युवराज सोनार पुणे यांनी आरास केली आहे, तर विद्युत रोषणाई पुंडलिक महात्मे, शिरोळ, कोल्हापूर या भाविकांनी केली आहे. 

श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने माघी वारी जया एकादशी निमित्त श्री विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात फुलापासून सुंदर व  मनमोहक अशी नयनरम्य फुलाची आरास करण्यात आल्याने मंदिर उजळून निघाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news