हिंगोली : घरगुती वादातून एकाची आत्महत्या

हिंगोली : घरगुती वादातून एकाची आत्महत्या

औंढा नागनाथ : पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील दरेगाव येथील एका व्यक्तीने घरगुती वादातून माळरानामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.14) उघडकीस आली. घटनेपूर्वी मयताने काही जणांना व्हिडिओ कॉल करून याबाबत सांगितले असल्याचेही समोर आले आहे.

गजानन श्रीपती गुहाडे ((रा. मु.दरेगाव ता. औंढा नागनाथ, वय 30) असे मयताचे नाव आहे.

याप्रकरणी सविस्तर माहिती अशी, मयत गजानन गुहाडे हा घरातून सोमवारी (दि.11) घरातून सकाळी दहाच्या दरम्यान निघून गेला. त्यानंतर काही वेळाने आपण गळफास लावून घेणार आहोत, असे मोबाईलवरून व्हिडिओ कॉल करून काही जणांना सांगितले.  मयत गजानन गुहाडे हा घरातून निघून गेल्यापासून मित्र व नातेवाईक जवळपासच्या सर्व माळरानावर त्याचा शोध घेत होते. तसेच याबाबत घरातून निघून गेल्याची तक्रार कुरुंदा पोलीस स्टेशन येथे देण्यात आली.

दरम्यान, शोध सुरु असतानाच गुरुवारी त्याचे प्रेत औंढा नागनाथ परिसरातील शेवाळतळा शिवाराच्या परिसरात माळरानात त्याच्या  मित्रांना आढळून आले. औंढा पोलिसांनी प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी औंढा नागनाथ आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे. पुढील तपास औंढा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक झुंजारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news