नाशिक : माजी मंत्री आव्हाड यांच्या अटकेचा सिन्नरमध्ये निषेध

सिन्नर : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेचा निषेध करताना विविध संघटनांचे पदाधिकारी.
सिन्नर : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेचा निषेध करताना विविध संघटनांचे पदाधिकारी.
Published on
Updated on

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
माजी मंत्री आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेचा राष्ट्रवादी काँग्रेससह विविध संघटनांच्यावतीने काळ्या फिती लावून निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात येऊन राज्य सरकारचा निषेध करण्यात याला. याबाबत पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन देण्यात आले.

हर हर महादेव या चित्रपटात दाखवलेल्या काही जाज्वल्य ऐतिहासिक घटनांचा व महापुरुषांचा अवमान केलेला आहे. ज्या घटना इतिहासात घडलेल्या नाही त्याही चित्रपटातून मांडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवराय व मावळे यांच्या  स्वराज्यसंघर्षावर चित्रपट अथवा ग्रंथ यांमार्फत जनमाणसापर्यंत माहिती पोहचणे गरजेची आहे, मात्र काही घटनांचे विद्रुपीकरण करून ते मांडणे चूक आहे, म्हणून डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जे चित्रपटामधून प्रदर्शित झाले ते चूक आहे. त्याला विरोध केला आहे, त्यांच्या या कृतीचे समर्थन करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य चिटणीस राजाराम मुरकुटे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार दत्ता वायचळे, शिवजन्मोत्सव समितीचे कार्याध्यक्ष मुंगसे, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगझाप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरध्यक्ष सुभाष कुंभार, हरिभाऊ तांबे, सचिन मचकुले, मेघा दराडे, रुबीना सय्यद, चैताली दराडे आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news