मध्यरात्री भांडण, नंतर पहाटेला पत्नीच्या डोक्यात घातला रॉड आणि स्वत:ही केली आत्महत्या!

Published on
Updated on

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

वैयक्तिक कारणावरून पती-पत्नीच्या झालेल्या भांडणातून आधी पतीने लोखंडी रॉडने पत्नीची हत्या केली. त्यानंतर घरीच गळफास घेऊन स्वत: आत्महत्या केल्याची थरारक घटना कोरपना तालुक्यातील कोडशी खुर्द येथे घडली. ही घटना आज शुक्रवारी (२३ एप्रिल) पहाटेच्या सुमारास घडली असून अलका सुनिल डवरे (वय २४) आणि सुनील मधुकर डवरे (वय २८) असे मृत पती-पत्नीची नावे आहेत. 

अधिक वाचा : यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मृतदेह गायब

पोलीसांच्या सुत्रानुसार, सुनील मधुकर डवरे आणि अलका यांचे विवाह झाला असून त्यांना एक चार वर्षाची मुलगी तर एक सहा वर्षाचा मुलगा आहे. सुनील मधुकर डवरे आपल्या परिवारासह कोरपना तालुक्यातील कोळशी खुर्द येथे राहत होता. काल रात्री मुले झोपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पती-पत्नी मध्ये वैयक्तिक कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. यात पहाटेच्या सुमारास पती सुनील याने पत्नी अलका हिच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. त्यात ती ठार झाली. त्यानंतर घरीच पती सुनीलने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. मुले झोपत असताना ही घटना घडल्याने त्यांना याबाबत अजिबात कल्पना नाही.  

अधिक वाचा : चंद्रपूर : ऑक्सिजन बेड न मिळाल्याने 'त्या' वृद्धाने घेतला झाडाखाली अखेरचा श्वास

दरम्यान, नेहमीप्रमाणे सकाळी उठून डवरे दांपत्य घरची कामे करताना दिसली नाहीत. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी घरी जावून पाहिले असता, पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तर पतीचा मृतदेह गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत होता.  

अधिक वाचा : शालूचा स्वत:च्या 'वावरात' साडीमध्ये जलवा!

यानंतर या घटनेची माहिती सर्वप्रथम पोलीस पाटील यांना देण्यात आली. त्यांनी ती माहिती कोरपणा येथील पोलिसांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून दिली. यानंतर घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अरुण गुरनुले हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा केला असून दोन्ही मृतदेह हे कोरपणा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदना करता पाठविले आहेत. तसेच याप्रकरणी मृत पती सुनील डवरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news