

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील विविध २२ गावामधील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी २२ पैकी १६ ग्रामपंचायतवर आपले वर्चस्व कायम ठेवले. परंतु या निवडणुकीत महत्त्वाच्या ग्रामपंचायत बिडकीन, आडुळ या ठिकाणी ठाकरे गटाने आपला झेंडा फडकवला आहे.
मंगळवारी रोजी सकाळी आठ वाजता पैठण तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये तहसीलदार शंकर लाड, वरिष्ठ नायब तहसीलदार दत्तात्रय निलावाड, गिरगावशंकर आवळे, विष्णू घुगे, निवडणूक सहाय्यक अमोल पाखरे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५० कर्मचाऱ्यांच्या मदतीने २२ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी दहा टेबलवर सुरू करण्यात आली होती. मतमोजणीच्या एकूण आठ फेऱ्यांमध्ये सदरील मतमोजणी करण्यात आली.
अधिक वाचा :