सप्तश्रृंगगड : पुढारी वृत्तसेवा
आज सप्तशृंगगडावर आई भगवतीची पंचामृत पूजा करून शारदीय नवरात्रौत्सवाच्या चौथ्या माळेला उत्साहात प्रारंभ झाला. सकाळपासूनच गडावर धुके आणि रिमझिम पावसाने हजेरी लावली. काही भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर येण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ठिकठिकाणच्या पोलिस बंदोबस्तामुळे भाविकांचा हिरमोड झाला. त्यामुळे सप्तशृंगगड हा भाविकांविना सुनासुना पाहण्यास मिळत आहे.
यावेळी देवीच्या दर्शनाची आस असणाऱ्या भाविकांकडून जगावरचे कोरोनाचे संकट लवकर टळू दे. तुझ्या भाविकांना तुझे दर्शन लवकर घडू दे अशी प्रार्थना केली जात आहे.
चतुर्थीचे दिवशीं अंबे शृंगार मांडिला हो!!
मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळां हो!!
कंठींचीं पदकें कांसे पीतांबर पिवळा हो!!
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो!! उदो!!३!!