सोलापूर विमानतळ परिसरात आग | पुढारी

Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

सोलापुरातील होटगी रोडवर असलेल्या विमानतळ परिसरास सोमवारी (दि.१९) रात्री ११.३० च्या सुमारास ही आग लागली. शंकरनगरच्या बाजूने सुरवातीस आग लागल्याचे नागरिकांनी सांगितले, विमानतळाच्या तीनही बाजूने आग पसरत गेली. वाळलेले गवत आणि वाऱ्यामुळे आग चांगलीच भडकली होती.

अधिक वाचा :गुजरातच्या रुग्णालयात मृतदेहांचा खच; तीन दिवसांपासून अंत्यविधी न झाल्याने पसरली दुर्गंधी

आगीचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमनच्या सुमारे १२ गाड्या दाखल झाल्या. दरम्यान आग पसरू नये म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले. आगीच्या झळा परिसरातील शंकर नगर, रेवणसिध्देश्वर नगर, भारातमाता सोसायटीतील घरांना लागत होत्या. 

अधिक वाचा :  'राज्यात लवकरच कडक लॉकडाऊनचा निर्णय'

त्यामुळे या परिसरातील नागरिक घराबाहेर पडले होते. आगीच्या ज्वाळांमुळे परिसरात एकच घबराट पसरली. रात्री उशिरापर्यंत आग धुमसत होती, विमानतळ परिसराला सुरक्षा भिंत आसल्याने मोठा अनर्थ टळला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news