मुंबई : पुढारी ऑनलाईन
काय चाललयं काय? अभिनेत्री दिशा पटानी आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे पुन्हा एकदा एकत्र दिसले. चर्चा रंगलीय ती त्यांच्या डिनर डेटची. या चर्चेमध्ये टायगर श्रॉफचा पत्ताच नाही. त्यामुळे सोशल मीडिया युजर्सदेखील म्हणू लागले आहेत, टायगर जिंदा है? इतकेच नाही तर दिशाला आदित्यसोबत डिनरवेळी पाहण्यात आल्यानंतर नेटकर्यांनी ट्रोल करणे सुरू केले आहे.
दिशाने या डिनर डेटवर रेड टॉप आणि डेनिमचा शॉर्ट स्कर्ट घातला होता. तर आदित्य ठाकरे यलो टी-शर्टमध्ये कॅज्युअल आणि कूल दिसत होता.
मध्यंतरी, मुंबईतील बांद्रा परिसरात अभिनेत्री दिशा पटानी आदित्य ठाकरेसोबत कॅमेराबध्द झाली होती. उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा लंचसाठी एकत्र दिसले होते. आदित्यने स्वत: गाडी चालवली. गाडीमध्ये दिशा आदित्यच्या शेजारी बसली दिसली होती. या लंचनंतर दिशा आणि आदित्यबद्दल चर्चांना उधाण आले होते.
अधिक वाचा : आदित्य ठाकरे-दिशामध्ये शिजतयं तरी काय?
आता पुन्हा दिशा आणि आदित्य एकत्र दिसल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. परंतु, नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. खरंतर, दिशा नेहमी आपला बॉयफ्रेंड टायगरसोबत दिसते. आता ती आदित्यसोबत दिसत असल्याने टायगर आणि दिशाच्या चाहत्यांना आवडलेलं नाही. युजर्स दिशाला 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' यासारखी कॉमेंट करून ट्रोल केले जात आहे.