औरंगाबाद : विद्यापीठात परीक्षेचा गोंधळ संपेना; विद्यार्थ्यांनी दिली हॉलतिकीट विना परीक्षा

File Photo
File Photo

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची परीक्षा आणि गोंधळ हे समीकरण झाले असून मंगळवारी घेण्यात आलेल्या पदव्युत्तर परीक्षेत काही विद्यर्थ्यांना हॉलतिकीत न मिळाल्याने विद्यार्थ्यांना कॉलेजच्या ओळखपत्रावरून परीक्षा केंद्रात प्रवेश घेत परीक्षा द्यावी लागली.

विद्यापीठाच्या परीक्षेत सातत्याने होत असलेला गोंधळ पुन्हा समोर आला आहे. विद्यार्थ्यांना वेळेत हॉल तिकीट मिळाले नाही, त्यामुळे विद्यार्थी कॉलेजच्या ओळखपत्राचा माध्यमातून महाविद्यालयात गेले व पीआरएन नंबरवरून विना हॉल तिकीटच परीक्षा दिली. सकाळपासून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते त्यामुळे पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट न मिळाल्याचे प्रकार समोर आले आहेत. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट न मिळाल्यामुळे विद्यापीठाने पर्यायी व्यवस्था म्हणून विद्यार्थ्यांना पीआरएन नंबरवर परीक्षा देऊ देण्याची सूचना केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली. डॉ. बाबासाहेब विधी महाविद्यालय व व्ही.एन.पाटील विधी महाविद्यालय येथे असे प्रकार घडला.

परीक्षेपासून कुणी वंचित नाही 

सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, आम्ही सर्व हॉलतिकीत परीक्षेच्या एक दिवस आगोदरच महाविद्यालयांना पाठवले. त्यामुळे कुणी विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले नाही असे विद्यापीठ प्रशासनाने माहिती दिली.

-हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news