

सरुड (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी संशयित तरुणाविरुद्ध शाहूवाडी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी संशयित तरुणाविरुद्ध तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी (वय १५) ही शाळेला जात असताना संशयित तरुण हा तिचा पाठलाग करून त्रास देत होता. पीडित मुलगी सोमवारी दारात भांडी घासत असताना संशयिताने तिच्या जवळ जात 'तू मला आवडतेस.. माझ्या बरोबर येणार की नाही सांग.' असे म्हणून मुलीची छेड काढली. शिवाय घराच्या मागे मुलीचा हात पकडून जवळ करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत पीडित मुलीने आपल्या वडिलांना झालेला प्रकार सांगितला. यानंतर वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक करून मंगळवारी दुपारी कोल्हापूर विशेष सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा