Vardha Acid attack : एकतर्फी प्रेमातून महिलेवर ॲसिड हल्ला

file photo
file photo
Published on
Updated on

वर्धा; पुढारी वृत्तसेवा: Vardha Acid attack : वर्ध्यात महिलेवर ॲसिडने हल्ला करण्यात आला. शहरातील महावीर गार्डन परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. वर्धा येथील महावीर गार्डन परिसरात सुरक्षा रक्षक असलेल्या व्यक्तीने महिलेच्या अंगावर शौचालय धुण्याचे ॲसिड फेकले. गुरुवारी (दि.१३) ऑक्टोबर रोजी ही घटना घडली.

Vardha Acid attack : या घटनेत पीडित महिला जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले. पीडित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित घटनेतील आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. एकतर्फी प्रेमातून ५० वर्षीय व्यक्तीने महिलेवर पाठीमागून शौचालय धुण्याचे ॲसिड फेकले. त्यामुळे महिलेच्या पाठ, मानेवर जखमा झाल्या आहेत.

Vardha Acid attack : पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचल्याने महिलेला तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध झाली. सदर घटना गंभीर असली तरी, पाठीमागून ॲसिड फेकल्याने पीडित महिला गंभीर जखमी झालेली नाही. आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची महिती पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news