Acid Attack Surviver : दोन पलंग, दोन कपाट….हवे- लक्ष्मी अग्रवालचे ट्विट ट्रेंडिंगमध्ये | पुढारी

Acid Attack Surviver : दोन पलंग, दोन कपाट....हवे- लक्ष्मी अग्रवालचे ट्विट ट्रेंडिंगमध्ये

पुढारी ऑनलाइन डेस्क : Acid Attack Surviver अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल हीचे एक ट्वीट मोठ्या प्रमाणात ट्विटरवर ट्रेंडिग होत आहे. अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्यांसाठी एक शेल्टर होम उभारण्यासाठी तिने मदतीचे आवाहन केले आहे. यासाठी तीने एक ट्विट केले आहे.

अहमदनगर : जामखेडमध्ये युवकाचा खून; शोधासाठी विविध पथके रवाना

या ट्विटमधून तीने आम्हाला दोन पलंग, दोन कपाट, एक टेबल, एक कूलर, काही बेडशीट आणि थोडे राशन देण्याचे आवाहन केले आहे.
यामध्ये लक्ष्मीने असेही म्हटले आहे की, ते जुने सेकंट हॅण्ड सामान आनंदाने स्वीकारतील. तसेच हे सर्व त्यांना दिल्ली UT मध्ये हवे आहे.
ट्विट सह लक्ष्मीने आपल्या ‘The Laxmi Foundation’  चे एक कार्ड प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये तीने वरील सर्व मुद्दे मांडले आहे.

कोण आहे लक्ष्मी अग्रवाल?

लक्ष्मी अग्रवाल ही Acid Attack Surviver अॅसिड हल्ल्यातून बचावलेली एक तरुणी आहे. फक्त वयाच्या 15 व्या वर्षी तिच्यावर 2005 मध्ये एका 32 वर्षीय व्यक्ती गुड्डू उर्फ नईम खान याने तिच्यावर अॅसिड हल्ला केला होता, कारण तीने त्याच्याशी लग्न करायला नकार दिला होता.

यानंतर माध्यमांमधून तिची कहानी अनेक ठिकाणी वायरल झाली. आमीर खानच्या सत्यमेव जयतेमध्ये तिची मुलाखत घेण्यात आली होती. तर तिच्यावर एक चित्रपटही बनवण्यात आला होता. छपाक या चित्रपटात दीपिका पादुकोन हीने तिची भूमिका साकारली होती.
हल्ल्यातून बचावल्यानंतर लक्ष्मी मोठ्या हिंमतीने पुन्हा उभी राहिली. तसेच तीने आपल्यासारख्याच इतर महिलांसाठी एक फाऊंडेशन स्थापन केले.

Acid Attack Surviver  लक्ष्मीने अॅसिड विक्रीवर बंदी आणावी या मागणीसाठी तीने 27000 हस्ताक्षर एकत्र करून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेऊन न्यायालयाने सरकारला एसिड विक्रीवर बंधने आणण्याचे आदेश दिले होते. तसेच तिच्या प्रयत्नामुळे पुढे संसदेत अॅसिड हल्ल्यावरील अभियोग पुढे वाढवण्यसाठी सोपे केले. तीने स्टॉप सेल अॅसिड ची स्थापना केली आणि हे अभियान मोठ्या प्रमाणावर चालवले. तिच्या या प्रयत्नांसाठी तिला नंतर अनेक पुरस्कार देखिल मिळाले आहे.

Back to top button