पिंपरीतील नगरसेवक जाणार गोवा,चंदीगड दौर्‍यावर | पुढारी

पिंपरीतील नगरसेवक जाणार गोवा,चंदीगड दौर्‍यावर

मुदत संपत आल्याने दौर्‍यांचे सत्र; खर्चास स्थायी समितीची आयत्या वेळी मान्यता

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कार्यकाळ संपुष्टात येत असताना, ओमायक्रॉन व कोरोनाचे संकट पुन्हा वाढत असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचे अभ्यास दौरे सुरुच आहेत.

स्थायी समिती, क्रीडा, शहर सुधारणा समिती, ‘फ’ क्षेत्रीय समितीनंतर आता ‘क’ आणि ‘ई’ क्षेत्रीय समितीचे नगरसेवक दौर्‍यावर जाणार आहेत. नगरसेवक स्वच्छ भारत अभिनायाअंतर्गत पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या गोव्यातील पणजी व पंजाबमधील चंदीगडच्या दौर्‍यावर जाणार आहेत. त्यासाठीच्या खर्चास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

का रे दुरावा! विराटचे नाव टाळून गांगुलींकडून टीम इंडियाचे अभिनंदन

महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा तिढा, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको असा विधीमंडळाने ठराव केला असला तरी, राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे.

त्यामुळे नियोजित वेळेत निवडणूक झाल्यास जानेवारी 2022 अखेरपर्यंत आचारसंहिता लागू शकते. ओमायक्रॉन, कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे जर निवडणूका लांबणीवर गेल्या.

बीड : वृद्ध पतीने कोयत्‍याने सपासप वार करून पत्‍नीला संपवले

तरी, विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाल 12 मार्च 2022 पर्यंत आहे. म्हणजेच केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे अभ्यास दौर्‍याच्या नावाखाली नगरसेवकांनी विविध ठिकाणचे दौरे आयोजित केले आहेत.

स्थायी समिती, क्रीडा, शहर सुधारणा समिती, ‘फ’ क्षेत्रीय समितीचे सदस्य इंदूर, पंजाब, हरियाणाच्या दौर्‍यावर जाणार आहेत. त्या दौर्‍याच्या खर्चाला मागील आठवड्यात झालेल्या स्थायी समिती सभेत आयत्यावेळी मान्यता दिली गेली.

जानेवारीमध्ये 16 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या संपूर्ण सुट्ट्यांची यादी एका क्लिकवर

स्थायी समितीच्या बुधवारी (दि.29) झालेल्या सभेत ‘क’ आणि ‘ई’ क्षेत्रीय समिती नगरसेवकांच्या अभ्यास दौर्‍याच्या खर्चाला मान्यता दिली.
महापालिकेचे आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत. प्रत्येक कार्यालयाच्या हद्दीत 16 नगरसेवक येतात.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ‘क’ क्षेत्रीय कार्यालयातील नगरसेवक आणि प्रभागातील अधिकार्‍यांचा पणजी, चंदीगड अभ्यास पाहणी दौरा करण्यास समितीने 9 नोव्हेंबरला ठराव मंजूर केला. ‘ई’ क्षेत्रीय समितीचे नगरसेवक, अधिकार्‍यांच्या पणजी, चंदीगड दौर्‍याचा ठराव समितीने 27 डिसेंबर 2021 ला केला. या दौर्‍यासाठीच्या खर्चास स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली.

Back to top button