जानेवारीमध्ये 16 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या संपूर्ण सुट्ट्यांची यादी एका क्लिकवर | पुढारी

जानेवारीमध्ये 16 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या संपूर्ण सुट्ट्यांची यादी एका क्लिकवर

पुढारी ऑनलाईन: नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता फक्त काही तास उरले आहेत, पण नवीन वर्षात तुमचे बँकांशी जास्त व्यवहार असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. खरं तर, भारतीय रिझर्व्ह बँकने (आरबीआय) जारी केलेल्या जानेवारीमधील बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार, जानेवारी 2022 मध्ये देशभरातील सर्व बँका 16 दिवस बंद राहतील. आम्हाला सांगू इच्छितो की, साप्ताहिक सुट्टी व्यतिरिक्त इतर अनेक सुट्ट्यांमुळे जानेवारीमध्ये विविध राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

कोहली आणि रोहितमध्ये कोणाला जास्त सॅलरी मिळते? दोघांमध्ये आहे करोडोंचा फरक

राज्यांनुसार सुट्ट्याही वेगळ्या

माहितीनुसार, विविध राज्यांतील बँकांना अनेक उत्सव आणि कॅलेंडरनुसार वेगवेगळ्या सुट्ट्या असतील. गंगटोकमधील सर्व बँका लॉसॉन्गच्या निमित्ताने बंद राहतील, तर इतर राज्यातील बँका सुरू राहतील. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त बँक सुट्टी फक्त कोलकातामध्ये लागू आहे. आरबीआयने प्रादेशिक सुट्ट्या आणि कॅलेंडरवर आधारित बँकांसाठी विविध सुट्ट्या ठेवल्या आहेत. जानेवारीमध्ये 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. मात्र, बँकांच्या सुटीच्या काळातही ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहतील. जानेवारी 2022 मधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी येथे आम्ही देत आहोत.

Rewind 2021 : या वर्षात ‘लोकल टू ग्लोबल’ परिणाम घडवणार्‍या या घटना घडल्या.

जानेवारी २०२२ मध्ये राज्यनिहाय बँक सुट्ट्या

1 जानेवारी 2022: नवीन वर्षाचा दिवस (देशव्यापी सुट्टी)

3 जानेवारी 2022:: नवीन वर्षाचे सेलिब्रेशन/लोसुंग (सिक्कीम)

4 जानेवारी 2022:: लोसुंग (मिझोरम)

11 जानेवारी 2022: मिशनरी दिवस

12 जानेवारी 2022: स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन

14 जानेवारी 2022:: मकर संक्रांती (अनेक राज्ये)

15 जानेवारी 2022:: पोंगल (आंध्र प्रदेश, पुडुचेरी, तामिळनाडू)

18 जानेवारी 2022:: थाई पूसम (चेन्नई)

26 जानेवारी 2022:: प्रजासत्ताक दिन (देशभर)

31 जानेवारी 2022 मी-डैम-मे-फी (असम)

निवडणूक रोख्यांची विक्री १ जानेवारीपासून सुरु होणार, सरकारने दिली मान्यता

जानेवारी 2022 मध्ये बँकांना असणाऱ्या साप्ताहिक सुट्टी

2 जानेवारी 2022: रविवार

8 जानेवारी 2022: दुसरा शनिवार

9 जानेवारी 2022: रविवार

16 जानेवारी 2022: रविवार

22 जानेवारी 2022: चौथा शनिवार

23 जानेवारी 2022: रविवार

30 जानेवारी 2022: रविवार

 

Back to top button