बीड : वृद्ध पतीने कोयत्‍याने सपासप वार करून पत्‍नीला संपवले | पुढारी

बीड : वृद्ध पतीने कोयत्‍याने सपासप वार करून पत्‍नीला संपवले

बीड : पुढारी वृत्‍तसेवा

वृद्ध पतीने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करत निर्घृणपणे हत्या केली. ही विदारक घटना गेवराई तालुक्यातील खांडवी येथे आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या विदारक घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली.

या विषयी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि, गेवराई तालुक्यातील खांडवी येथील पिराजी शेजूळ (वय 65) यांनी त्यांची पत्नी संजीवनी पिराजी शेजूळ (वय 60) यांच्यावर आज पहाटेच्या दरम्यान कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेने गेवराई तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

सदरील घटना गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर गावात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. पिराजी शेजूळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्ह्याची कबूली शेजूळ यांनी दिली. मात्र खून कोणत्या कारणावरून झाला हे मात्र अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही.

Back to top button