बुलढाणा : टुनकी परिसरात संशयित व्यक्तीच्या ताब्यातून ६ देशी पिस्तुल जप्त | पुढारी

बुलढाणा : टुनकी परिसरात संशयित व्यक्तीच्या ताब्यातून ६ देशी पिस्तुल जप्त

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : मध्यप्रदेश सीमेजवळ असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील टुनकी परिसरात देशी बनावटीचे पिस्तुल बाळगून ते विकण्यासाठी एक व्यक्ती वावरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन सोनाळा पोलिसांच्या पथकाने टुनकी-लाडणापूर मार्गावर केदार नदीच्या पुलाजवळ एका संशयित व्यक्तीची अंगझडती घेतली. त्याचे ताब्यातून ६ पिस्तुल (किंमत १ लाख ८० हजार रुपये), जप्त केले व त्याला अटक केली. वसीमखान इलियासखान (वय २२ रा.सिंगार पुन्हाना जिल्हा नुहू हरियाणा) असे आरोपीचे नाव आहे. सोनाळा पोलीस स्टेशनचे एपीआय चंद्रकांत पाटील, पोहे का विनोद शिंत्रे, राहूल पवार, शेख इम्रान शेख रहेमान यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button