Nurse Death : वाळू डंपरने घेतला परिचारिकेचा जीव | पुढारी

Nurse Death : वाळू डंपरने घेतला परिचारिकेचा जीव

जळगाव, पुढारी वृत्तसेवा

भरधाव असणाऱ्या वाळू डंपरच्या धडकेत जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिपरिचारिका असलेल्या महिलेचा जळगाव – भुसावळ दरम्यान महामार्गावर तरसोद फाट्यानजीक अपघातात मृत्यू झाला आहे. (Nurse Death) जिल्हाभरात अवैध वाळू वाहतुकीमुळे होणारे अपघात नित्याचेच झाले आहे.

हा अपघात जळगाव – भुसावळ महामार्गावर तरसोद फाट्यानजीक आज दुपारी झाला. डंपर क्रमांक एमएच १९ वाय ७७७३ ने सदर परिचारिकेच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रेरणा देविदास तायडे (वय-३२ रा.कंडारी, ता.भुसावळ) हिचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्या स्कुटीचा चुराडा झाला आहे. (Nurse Death)

या अपघाताची माहिती कळताच, नशिराबाद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहाय्यक फौजदार अलीयार खान, कर्मचारी हसरत सैय्यद, महिला कर्मचारी लिना लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हा अपघात इतका भयंकर होता की, दुचाकी डंपरच्या खाली दाबली जाऊन महिलेच्या शरीराचा चेंदामेंदा झाला होता. मयत प्रेरणा तायडे या जिल्हा रुग्णालयात अधिपरिचारिका म्हणून काम करत होत्या. कामावरून सुट्टी झाल्याने त्या घरी जात होत्या.

नशिराबाद पोलिसांनी अपघातग्रस्त डंपर ताब्यात घेतला असून, गुन्हाही दाखल करण्यात आला. तायडे यांच्या मृत्यूची माहिती कळताच त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत एकच आक्रोश केला.

हे ही वाचा:

Back to top button