

नवी दिल्लीतील प्रदूषणात काही प्रमाणात घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारपासून शाळा (Delhi School) सुरू करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर केला.
शाळा, महाविद्यालये तसेच इतर शैक्षणिक संस्था २९ तारखेपासून सुरु होतील, असेही राय यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान वायू प्रदूषणात वाढ होऊ नये, याकरिता सीएनजी आणि इलेक्ट्रिक वगळता इतर इंधनावर धावणाऱ्या वाहनांना दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे. २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीसाठी हा आदेश लागू राहील, असे दिल्ली सरकारकडून सांगण्यात आले आहे. (Delhi School)
हे ही वाचा :