Nashik News : मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्याने खर्डेत जल्लोष  | पुढारी

Nashik News : मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्याने खर्डेत जल्लोष 

देवळा : पुढारी वृत्तसेवा; मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला अखेर यश मिळाले. शनिवारी (दि. २७) रोजी राज्य सरकारने तसा अध्यादेश काढून आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्याने खर्डे ता. देवळा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊन आनंद उत्सव साजरा केला.

यावेळी विखार्या पहाड वरील गणेशपुरी महाराज, उपसरपंच सुनील जाधव, शिवसेनेचे (उबाठा गट) सह संपर्क प्रमुख विजय जगताप, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, विकास सोसायटीचे संचालक कारभारी जाधव, संदीप पवार, शशिकांत पवार, बापू किसन देवरे, काकाजी पवार, शशिकांत ठाकरे, भाउसाहेब गांगुर्डे, रामदास भामरे, प्रवीण देवरे आदी उपस्थित होते.

विठेवाडीत जल्लोष 

वाशी नवी मुंबईच्या शिवाजी चौकात मराठा आरक्षणाची घोषणा होताच महाराष्ट्रात जल्लोष साजरा करण्यात आला. देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर चौफुलीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पुतळ्याची पुजा करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच साखर वाटून गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने समन्वयक कुबेर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, ग्रामपंचायत सदस्य राहुल निकम, सोसायटी सदस्य  कैलास कोकरे, सचिव संजय निकम, सुभाष पगार, योगेश निकम, बबलु निकम, कमलेश निकम, सुनिल कोकरे, दिनकर अहिरे, योगेश हिरे, प्रविण निकम, उमेश निकम, पपु पवार, राजेंद्र निकम, राजेंद्र आहेर, बापू शिंदे, महेंद्र जाधव, भिका निकम, दिपक पवार आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button