

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमध्ये नितीशकुमार पुन्हा एकदा एनडीएसोबत जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला धक्का बसला आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील ११ जागांवर काँग्रेससोबत युती झाल्याचे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी जाहीर केले आहे. Akhilesh Yadav
उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात काँग्रेस आणि सपामध्ये अकरा जागांवर निवडणूक लढविण्याबाबत एकमत झाले आहे, असे सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले. काँग्रेससोबतची आमची सौहार्दपूर्ण आघाडी झाली असून सुरूवातीला ११ जागा लढविण्याबाबत एकमत झाले आहे. ही सुरूवात असून आमची ही आघाडी विजयाच्या समीकरणासह पुढे जाईल, असे यादव म्हणाले. Akhilesh Yadav
हेही वाचा