Pimpri News : देहू नगरपंचायतीच्या बैठकीत फक्त चर्चा | पुढारी

Pimpri News : देहू नगरपंचायतीच्या बैठकीत फक्त चर्चा

देहूगाव : पुढारी वृत्तसेवा : देहूगाव नगरपंचायतीच्या वतीने बुधवार (ता.1) रोजी मासिक बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मात्र ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे ही बैठक केवळ चर्चात्मक होती का? असा प्रश्न देहूच्या नागरिकांनी उपस्थित केला आहे. देहू नगरपंचायत हद्दीत सुरक्षिततेसाठी फटाका स्टॉलधारकांसाठी एकाच ठिकाणी (एसटी बस स्थानकाजवळ) जागा निश्चित करून परवानगी देऊन त्याची यादी पोलिस ठाण्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला. खंडित पाणीपुरवठा आणि पथदिवे दुरुस्तीच्या ठेकेदारांकडून कामे होत नसल्याची तक्रार नगरसेवकांनी मांडली.

खाद्यपदार्थ विक्रेत्यांची नोंद घेत परवाने देणे आणि अन्न व औषध प्रशासनाला तपासणीसाठी पत्रव्यवहार करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या वेळी नगराध्यक्ष स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्ष शीतल हगवणे, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, गटनेता, सभापती, नगरसेवक, नगरसेविका, अभियंता, कर्मचारी आदी उपस्थित होते.

  • देहू परिसरामध्ये जागोजागी उभारण्यात येणारे फटाके स्टॉल, यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि होणार्‍या दुर्घटना टाळण्यासाठी एकाच ठिकाणी जागा निश्चित करून स्टॉलधारकांना परवानगी देणे, परवानगीधारक फटाका स्टॉलची यादी देहूरोड पोलिस ठाण्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटरअंतर्गत विठ्ठलवाडी माळवाडी वडाचा माळ या ठिकाणी बाह्यरुग्ण तपासणी केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणे, माझी वसुंधराअंतर्गत पुलाला रंगकाम आणि सुशोभीकरण करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सुशोभीकरण व बोधचिन्ह उभारणे, परंडवाल चौकातील पुलाची रुंदी वाढविणे, जुना पालखी मार्ग रस्ता आणि ओढ्यावरील पूल तयार करणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.
  • विविध प्रभागात रस्ता, ड्रेनेजलाईन पाण्याचे नवीन पाईपलाईन, गटार दुरुस्ती करणे, दिव्यांगांना पाच टक्के निधीतील सार्वजनिक कामे व आर्थिक तरतुदीचा व विद्युत तारांना चिकटलेली झाडे फांद्या तोडणे
  •  जलशुद्धीकरण केंद्राच्या कामास मुदतवाढ देणे, पंप व मोटर वार्षिक देखभाल दुरुस्ती, साहित्य पुरवठा विषयावर चर्चा करताना पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याचे तर अनेक ठिकाणी खंडित पुरवठा होत असलेल्या तक्रारी नगरसेवकांनी मांडल्या.
  • काम न करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. स्ट्रीट लाईट देखभाल दुरुस्तीसाठी वार्षिक 24 लाख रुपये खर्च नगरपंचायात करते. अशा तक्रारीवरून हायड्रोजन शिडी वाहन घेण्यावर चर्चा करण्यात आली.
  • संत तुकाराम महाराज मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर दिशादर्शक फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना आणि दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी चर्चा करून समिती स्थापन करण्यात आली.
  • नवीन रस्ता तयार करण्यापूर्वी संबंधित रस्त्याची जागा नगरपंचायतकडे वर्ग केली आहे का? या तपासणी करूनच रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा

पुणे : यंदा गाळप तीन महिने; 60 कारखान्यांना ऊस गाळपाचे परवाने वितरित

पुणे : लेखापरीक्षकांचा बहिष्कार सकारात्मक चर्चेनंतर मागे

सांगली : कुपवाड, मिरजेतील 1200 उद्योगांचा पाणीपुरवठा बंद

Back to top button