अमरावतीमध्ये जमावबंदी लागू, शांतता राखण्याचे आवाहन | पुढारी

अमरावतीमध्ये जमावबंदी लागू, शांतता राखण्याचे आवाहन

अमरावती, पुढारी वृत्तसेवा :

त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असून, राज्यातील अमरावतीमध्ये त्याचे हिंसक परिणाम दिसत आहेत. अमरावतीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. शहरातील परिस्थिती बिघडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अमरावतीत कलम 144 लागू केले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शहरात शांतता व सुव्यवस्था राखावी असे आवाहन पोलिस प्रशासन आणि पालकमंत्र्यांनी केले आहे.

त्रिपुरातील घटनेचे तीव्र पडसाद राज्यातील अमरावती शहरात उमटले असून, त्याला हिंसक वळण लागले आहे. शहरातील राजकमल चौकात मोठ्या संख्येने जमाव एकवटला आहे. त्या जमावाकडून दुकानांची तोडफोड केली जात आहे. हि परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी प्रशासनाच्यावतीने कलम 144 लागू करण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर नागरिकांनी शांतता राखावी आणि कोणत्याही मालमत्तांचे नुकसान करू नये असे आवाहन पोलिस व पालकमंत्र्यांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे आता ज्या ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आलीय त्या परिसरात कोणत्याही हिंसक घटना घडवणाऱ्यांवर पोलीस अटक करून कारवाई करू शकतात.

राजकमल चौकात पोलीसांकडून लाठीमार आणि अश्रूधूराचा वापर

शहरातील राजकमल चौकात काल एका गटाकडून लूटमार, जाळपोळ, आणि तोडफोडीच्या घटना केल्या होत्या त्याचे पडसाद आजही दिसत आहे. आजही जमावाने या परिसरातील एका टपरीला आग लावली. जमाव आणखी हिंसक बनू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधूरांचा वापर केला. त्याशिवाय शहरात दंगानियंत्रक पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

Back to top button