Nashik Bribe News : लाचखोर व्यवसाय कर अधिकारी महिलेला न्यायालयीन कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बंद कंपनीचा व्यवसाय कर रद्द करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच घेताना व्यवसाय कर अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली. स्नेहल सुनील ठाकूर (52, रा. अश्विननगर, नाशिक) असे लाच घेतलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Nashik Bribe News )
संबधित बातम्या :
- Wine industry : वाइन उद्योगाच्या प्रोत्साहन योजनेला सरकारचा ‘ब्रेक’
- Nashik Tomato Price : मनमाडला टोमॅटोला मिळाला चिंचोक्याचा भाव, शेतकरी हतबल
- मराठा, धनगर आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलवा : संजय राऊत
तक्रारदार यांची सिक्युरिटी सर्व्हेिसेस कंपनी दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे कंपनीचा व्यवसाय कर रद्द व्हावा यासाठी त्यांनी 13 सप्टेंबर रोजी व्यवसाय कर अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. व्यवसाय कर रद्द करून देण्याच्या मोबदल्यात व्यवसाय कर अधिकारी ठाकूर यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची शहानिशा करून विभागाने सापळा रचला. त्यानुसार बुधवारी (दि. 20) कार्यालयात पंचांसमोर ठाकूर यांनी तक्रारदाराकडून तडजोड करीत चार हजार रुपयांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठाकूर यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.
गुरुवारी (दि. २१) ठाकूर यांना न्यायालयात हजर केले होते. त्यांच्या घरझडतीत काही आढळले नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले. विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक विश्वजित पांडुरंग जाधव, हवालदार प्रकाश डोंगरे, नाईक प्रणय इंगळे, शिपाई शीतल सूर्यवंशी, हवालदार संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा :
- Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या दरबारात प्रचंड गर्दी; भाविक-स्वयंसेवकांत गोंधळ
- किरण मानेंची ‘ती’ पोस्ट अन् ‘जय भीम नंबर प्लेट’ची तुफान चर्चा