मराठा, धनगर आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलवा : संजय राऊत | पुढारी

मराठा, धनगर आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलवा : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा, धनगर आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले- ”कोविड काळात आरोग्य खात्याने उत्तम काम केलंय. आमच्यावर खटले दाखल करणारे कोरोना काळात शेपटी घालून बसले होते.” संजय राऊत यांनी यावेळी सरकारवर घणाघात केला.

राऊत म्हणाले, आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांचा वेळकाढूपणा आहे. विधानसभा अध्यक्षांकडून कोर्टाच्या आदेशाचा अपमान आहे. अनेक महिने विधानसभा अध्यक्षांकडून वेळकाढूपणा सुरु आहे. यावेळी राऊत यांनी मराठा, धनगर आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलवा अशीही मागणी केली.

Back to top button