Subodh Bhave : 'कट्यार काळजात घुसली' नंतर सुबोध भावे आणतोय 'मानापमान'

पुढारी ऑनलाईन : सुपरहिट संगीतमय चित्रपट ‘कट्यार काळजात घुसली’ नंतर पुन्हा एकदा अभिनेता-दिग्दर्शक सुबोध भावे ( Subodh Bhave ) ‘मानापमान’ चित्रपटाद्वारे भव्यदिव्य संगीतमय नजराणा सादर करण्यास सज्ज झाला आहे. एफटीआयआय पुणे येथे या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला.
संबधित बातम्या
- ‘ Ghar Banduk Biryani ‘चा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर ‘या’ दिवशी
- Shahrukh Khan : शाहरुख खान लालबागचा राजाच्या दर्शनाला
- Priyanka Chopra : देसी गर्लचे संस्कार! छोटा बाप्पा अन् मालतीचा ‘तो’ निरागस फोटो व्हायरल
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘मी वसंतराव’, ‘गोदावरी’ आणि ‘बाईपण भारी देवा’चे बॉक्स ऑफिसवरील प्रचंड यश साजरे केल्यानंतर जिओ स्टुडिओज् आता कृष्णाजी खाडिलकर लिखित ‘मानापमान’ या प्रसिद्ध नाटकावरून प्रेरित एक नवीन संगीतमय कलाकृती घेऊन येत आहेत. कट्यार काळजात घुसली आणि डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटाची संपूर्ण टीम या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्रित येत आहे. आणि त्यासोबत प्रसिध्द संगीतकार शंकर- एहसान-लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे.
‘मानापमान’ चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याच्या वेळी आपलं मनोगत एका व्हिडिओद्वारे शेअर करत सुबोध भावे ( Subodh Bhave ) म्हणाले की, ‘माझ्या अत्यंत आवडत्या जागी जिथे मला प्रचंड ऊर्जा मिळते, जिथे येऊन आयुष्यात चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते, ती जागा म्हणजे, एफटीआयआय पुणे येथे कट्यार काळजात घुसली, आणि डॅा. काशिनाथ घाणेकर आणि माझ्या एका वेबसिरिजचा मुहुर्त ही येथेच या झाडाखाली पार पडला होता. आज माझा आगामी चित्रपट ‘मानापमान’ चा मुहुर्त देखील येथे होत आहे.

कट्यार काळजात घुसली, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटांची संपूर्ण तंत्रज्ञानांची टीम या चित्रपटात असणार आहे. तसेच प्रसिध्द संगीतकार शंकर- एहसान-लॉय यांचे संगीत असणार आहे. शिरीष गोपाळ देशपांडे यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत तर प्राजक्त देशमुख यांचे अतिरिक्त पटकथा आणि संवाद असणार आहेत. आम्ही सगळे पूर्ण प्रयत्न करू की उत्तम दर्जेदार चित्रपट तुमच्या समोर घेऊन येऊ. जिओ स्टुडिओज्, ज्योती देशपांडे निर्मित, आमच्या या चित्रपटावर मायबाप प्रेक्षकांचा आशिर्वाद असाच राहू दे. गणपती बाप्पा मोरया ! 🙏.’
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनीत ‘मानापमान’ चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होत असून भारतातील वेगवेगळ्या नेत्रदीपक ठिकाणी ते केलं जाणार आहे.
हेही वाचा :