सुबोध भावे कोरोना पॉझिटिव्ह; बायको आणि मुलालाही लागण | पुढारी

सुबोध भावे कोरोना पॉझिटिव्ह; बायको आणि मुलालाही लागण

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूडमधून कोरोनाबाधितांच्या धक्कादायक बातम्या येत असतानाच आणखी एक बातमी समोर आली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. सुबोध भावेची पत्नी आणि मोठ्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. 

दरम्यान, सुबोध भावेने आपली प्रकृती उत्तम असल्याची माहिती  दिली आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मी, मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला quarantine करून घेतले आहे. तज्ज्ञ डॉक्टरां च्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. गणपती बाप्पा मोरया

 

मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

आम्ही घरीच स्वतःला quarantine करून घेतले आहे.

तज्ज्ञ डॉ च्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत.

तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.

गणपती बाप्पा मोरया🙏🙏🙏


— Subodh Bhave (@subodhbhave) August 31, 2020

Back to top button