चंद्रपूर : सिरकाडा परिसरात विज पडून महिला ठार, एक गंभीर | पुढारी

चंद्रपूर : सिरकाडा परिसरात विज पडून महिला ठार, एक गंभीर

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा :  शेतावर काम करण्याकरीता गेलेल्या महिलांवर विज पडल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना सिंदेवाही तालुक्यातील सिरकाडा शेतशिवारात  आज बुधवारी दुपारी  1 वाजताचे सुमारास घडली. महानंदा मोतीराम अलोणे (वय ५८) असे मृतक महिलेचे नाव आहे.

सिंदेवाही तालुक्यातील शिरकाडा येथील दोन महिला शेतावर काम करण्याकरीता सकाळी गेल्या होत्या. दुपारीपर्यंम काम करीत होत्या.दुपारच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस कोसळला. यावेळी दोन्ही महिला शेतावर काम करीत असताना ज्याच्या लगतच विज कासेळली. यामध्ये महानंदा मोतीराम अलोणे नावाची महिला जागीच ठार झाली. तिच्या सोबत असलेली रोषणा प्रफुल गेडाम ही महिला गंभीर जखमी झाली. सदर घटनेची माहिती गावात होताच. गावकरी धावून गेले त्यांनतर जखम महिलेला रूग्णालयात हलविण्यात आले. जखमी महिलेवर उपचार सुरू आहे. या बाबत सिंदेवाही पोलिसांनी माहिती देण्यात आली आहे.

Back to top button