पुणे : डायजीन औषधांची विक्री थांबवण्याच्या सूचना | पुढारी

पुणे : डायजीन औषधांची विक्री थांबवण्याच्या सूचना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील अ‍ॅबॉट कंपनीचे उत्पादन असलेल्या डायजीन या अँटासिडची विक्री करणार्‍या औषध विक्रेत्यांची तपासणी सुरू केली आहे. औषध आणि अन्न प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी कंपनीच्या गोवा येथील प्लांटमध्ये तयार होणार्‍या औषधाची विक्री थांबवण्यास सांगितले आहे.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने 31 ऑगस्ट रोजी सुरक्षिततेच्या कारणास्तव अँटासिड जेलचा वापर बंद करण्याचा इशारा दिला. त्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत. औषधाचा रंग वेगळा, तिखट आणि कडू असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारींमुळे अ‍ॅबॉट कंपनीने गोव्यातील प्लांटमधील डिजेन अँटासिड औषध स्वेच्छेने परत मागवत आहेत.

नमुने प्रयोगशाळेत पाठविणार

डायजीन औषधांच्या पाच बॅचमध्ये दोष असल्याचा दावा केला जात आहे आणि कंपनीने गोवा प्लांटमध्ये उत्पादित केलेला सर्व साठा परत मागवला आहे. वितरण साखळीतील औषधांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवले जातील. कोणी नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास किंवा नमुन्यांमध्ये गुणवत्तेची समस्या आढळल्यास आवश्यक कारवाई केली जाईल.

अधिकार्‍यांनी केमिस्ट असोसिएशन पुणे डिस्ट्रिक्टला डायजेनची विक्री तत्काळ थांबवण्यास सांगितली आहे. केमिस्टना औषधांचा साठा परत मागवण्यास सांगितला आहे. घाऊक विक्रेते आणि वितरकांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. आम्ही औषधांची विक्री आणि वितरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.

– एस. व्ही. प्रतापवार, सहआयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन

हेही वाचा

जगातील 2 दिग्गज अंतराळ शास्त्रज्ञ करणार पृथ्वीचा अभ्यास; अवकाशात निरीक्षण शाळा पाठवण्याची मोहीम

पुणे : पाण्याच्या थकबाकीसंदर्भात मतभेद दूर होणार

पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या बॅगांची तपासणी

Back to top button