नाशिक : प्रमाणापेक्षा जास्त झोपेच्या गोळ्या सेवन केल्याने तरुणाचा मृत्यू | पुढारी

नाशिक : प्रमाणापेक्षा जास्त झोपेच्या गोळ्या सेवन केल्याने तरुणाचा मृत्यू

नाशिक : प्रमाणापेक्षा जास्त झोपेच्या गोळ्या सेवन केल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सातपूर येथील महादेववाडी परिसरात घडली. कैलास देवीदास कामडी (२७, रा. महादेववाडी) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. कैलासला निद्रानाशेचा त्रास जडल्याने ताे वैद्यकीय सल्ल्याने औषधे सेवन करत हाेता.

मात्र, रविवारी (दि. १०) रात्री त्याने गाेळ्या अतिप्रमाणात सेवन केल्या. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सातपूर पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button