नोंदणी व मुद्रांक विभागातील उपसचिव, सचिव कक्ष अधिकारी, नोंदणी महानिरीक्षक, उपमहानिरिक्षक, सह जिल्हा निबंधक, दुय्यम निबंधक यांचे कामकाज सीसीटीव्हीअंतर्गत जनतेसाठी खुले करावे. नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडील '53 अ'खालील प्रकरणांची शासनामार्फत चौकशी करावी व यास जबाबदार असलेले विधी अधिकारी यांना त्वरित निलंबित करावे. वादग्रस्त उपनोंदणी महानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी ठाणे शहर येथील कार्यकाळात केलेल्या बेकायदेशीर कामांची चौकशी करावी. 'कलम 32'खाली शासनाचा महसूल बुडविणारे छत्रपती संभाजीनगर येथील उपनोंदणी महानिरीक्षक विजय भालेराव यांचीही चौकशी करावी आदी मागण्या करण्यात आल्या.