धुळे : पाण्याच्या मुद्द्यावरून जनआंदोलन छेडण्याचा आमदार फारुख शाह यांचा इशारा | पुढारी

धुळे : पाण्याच्या मुद्द्यावरून जनआंदोलन छेडण्याचा आमदार फारुख शाह यांचा इशारा

धुळे : पुढारी वृत्तसेवा 

धुळे शहराने आतापर्यंत फक्त घोषणांच्या पोकळ वल्गना करणारे लोकप्रतिनिधी पाहिले. मात्र मी शहराच्या प्रत्येक भागात विकासाची कामे करीत आहे. मनपा सत्ताधारी गेल्या ८ महिन्यांपासून धुळेकर जनतेला पाण्याच्या मुद्यावर फसवित आहेत. दररोज पाणी पुरवठा करणे बाबतची घोषणा वारंवार करून धुळेकर जनतेला फसविले आहे. सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी लवकरच जन आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सूतोवाच आ. फारुख शाह यांनी केले.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियान अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक १६ मध्ये काँक्रिट रस्ता करण्याच्या ७९  लक्ष खर्चाच्या कामाचा शुभारंभ आ. फारुख शाह यांचे हस्ते करण्यात आला. मंदार बंगला, कृषीनगर येथे आयोजित केलेल्या शुभारंभ कार्यक्रमात आ. फारुख शाह यांनी मनपा सत्ताधाऱ्यांवर टीकेचे आसूड ओढले. मी निवडून आल्यानंतर ज्या कॉलनीत मनपाने गेल्या ४० वर्षात कामे केली नाहीत अशा कॉलनीमध्ये प्राधान्याने विकासाची कामे सुरू केली. मनपा सत्ताधारी गेल्या ८ महिन्यांपासून धुळेकर जनतेला पाण्याच्या मुद्यावर फसवित आहेत. दररोज पाणी पुरवठा करणेबाबतची घोषणा वारंवार करून धुळेकर जनतेला फसविले आहे. सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी लवकरच जन आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे आ. फारुख शाह यांनी सांगितले.

यावेळी जेष्ठ नेते हरिश्चंद्र लोंढे, प्रभाकर खंदारे, नगरसेवक योगेश ईसी, डॉ. दिपाश्री नाईक, प्यारेलाल पिंजारी, इकबाल शाह, आसिफ पोपट शाह, बी.यू.वाघ, भाईदास गवळे, विजय ठाकूर, डॉ.रवींद्र शिरसाठ, गोरख जाधव, मधुकर सैंदाने, बापूसाहेब वाघ, इंदु वाघ, गौतम पारेराव, नितीन म्हसदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button