Jobless Young Chinese : चीनमध्ये नोकर्‍या मिळण्यासाठी युवकांच्या मंदिरात फेर्‍या वाढल्या | पुढारी

Jobless Young Chinese : चीनमध्ये नोकर्‍या मिळण्यासाठी युवकांच्या मंदिरात फेर्‍या वाढल्या

बीजिंग; वृत्तसंस्था : चीनमध्ये मंदिरात जाणार्‍या तरुणांच्या संख्येत 2022 च्या तुलनेत 310 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रॉयटर्सनुसार यात 1990 नंतर जन्मलेल्यांची संख्या जास्त आहे. नोकरीसाठी तरुणांच्या मंदिरातील वार्‍या वाढल्याचे समोर आले आहे. (Jobless Young Chinese)

कोरोनानंतर चीनची अर्थव्यवस्था मंदीचा सामना करत आहे. लॉकडाऊन हटल्यानंतर चीनमध्ये सुमारे 1.16 कोटी युवक बेरोजगार आहेत. जिनिपिंग यांचे झिरो कोव्हिड धोरण आण शिक्षण क्षेत्रावरील निर्बंधांचे कारण यामागे असल्याचे बोलले जात आहे. नोकरी नसल्याने अस्वस्थ असलेल्या तरुणांची पावले मनःशांतीसाठी मंदिरांकडे वळत आहेत. चीनमधील चांगले शिक्षण घेणार्‍या युवकांपैकी एक पंचमांश युवक बेरोजगारीच्या समस्येचा सामना करत आहेत. (Jobless Young Chinese)

स्टॅस्टिस्टिक्स ब्युरोनुसार चीनमध्ये 16 ते 24 वर्षे वयोगटातील शहरी युवकांतील बेरोजगारीचा दर 18.1 टक्के होता. मार्चमध्ये तो वाढून 19.6 टक्के झाला. तर गेल्या जुलैमध्ये बेरोजगारीचा दर 19.9 टक्के अशा उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. मीडिया रिपोर्टनुसार, 2021 मध्ये नोकर्‍यांच्या अभावी 70 हजारहून जास्त पदवीधरांनी जेवण वाटपाचे काम केले होते.

10 लाख नोकर्‍यांचे लक्ष्य

या परिस्थितीत कसेही करून सुधारणा करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. 2022 मध्ये चीनमध्ये 1.10 कोटी नोकर्‍यांची उपलब्धता होती. या वर्षी हे लक्ष्य 1.20 कोटी इतके ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 10 लाख जास्त नोकर्‍या निर्मितीचा अधिकार्‍यांचा प्रयत्न आहे.

अधिक वाचा :

Back to top button