नांदेड : वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस; भींत अंगावर पडल्याने एकाचा मुत्यू | पुढारी

नांदेड : वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस; भींत अंगावर पडल्याने एकाचा मुत्यू

नरसीफाटा ; सय्यद जाफर : नायगांव तालुक्यात गुरूवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह गारांचा मोठा पाऊस झाल्याने अनेक घरावरील पत्रे उडाली. तर कोलंबी सह अन्य काही गावांत झाडे उमळून पडली आहेत. काहाळा टोळ नाक्याजवळ ढाब्याची भींत अंगावर पडून एक जन मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.

गेल्या दोन तीन दिवसापासुन नायगांव तालुक्यात ढगात वातावरण असुन गुरूवारी रात्री दोन वाजता ही तालुक्यात काही गावांत विजेच्या गडगडाटासह पाऊस पडला. पुन्हा दि २७ एप्रिल रोजी गुरूवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान अचानक कोलंबी, मांजरम, मोकासदरा, गडगा, नावंदी , टेंभुर्णी ,केदारवडगाव ,सोमठाणा ,गोदमगांव, काहाळा ,कुष्णुर, लालंवडी या गावांसह अन्य गावात भयानक वादळीवाऱ्यासह गारांचा तब्बल एक तास मोठा पाऊस पडला. या भयानक वादळामुळे अनेक गावांत झाडे उमळून पडली. तर अनेक घरावरील पत्रे उडाली. तसेच अनेक ठिकाणी विधुत तारा तुटल्या तर धुगंराळा येथे मेन रोड लगत असलेले जुने लिबांचे झाड रोडवर पडल्याने एका बाजूची वाहतुक बंद झाली होती.

अचानक आलेल्या वादळीवारा व गारांचा पाऊस पडल्याने शेतात असलेल्या फळबगेतील केळी , पपई, चिकु सह उन्हाळी ज्वारीचे ,व भुईमूग भाजी पाला सह अन्य पिकाचे मोठे नुकसान झाले आहे .या वादळी वा-यांचा तडाखा काहाळा येथील टोळ नाक्या जवळील काॅवल्य धाब्याला बसला असुन या वा-यात धाब्यावरील सर्व टिन पत्रे उडून बाजुला पडल्याने यात धाबा मालकाचे मोठे नुकसान झाले.

कोलंबी गावात वादळी वा-या मुळे गावांत येणा-या तीन ही रस्त्यावर झाडे उमळून पडली होती. पाऊस थांबताच येथील सरपंच प्रतिनीधी प्रल्हाद पा बैस व मनोहर पा.बैस यांनी सदर झाडे जेसीपीच्या साह्याने बाजुल करून रस्ता खुला केले.व गावात फिरून परिस्थितीचा आढावा घेऊन नायगाव तहसील यांना कळविले.

आश्रयास थांबलेल्या युवकाच्या अंगावर भींत पडल्याने युवकांचा मृत्यु

पाऊस आला म्हणून काहाळा खु.येथील व्यंकटी लक्ष्मण दंडलवाड वय ३२ हे तोल नाक्याजवळील कौव्यल्य ढाब्याजवळ आश्रयाल थांबले होते. पण गुरूवारी झालेल्या भयानक वादळामुळे सदर ढाब्यावरील टिन पत्रे तर उडालीच पण ढाब्याची भित व्यंकटी दंडलवार यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना नायगांवचे तहसीलदार गजानन शिंदे यांना कळताच त्यांनी व कुंटूर पोलीसांनी सदर ठिकाणी भेट दिली.

हेही वाचंलत का?

Back to top button