छत्रपती संभाजीनगर: शिवना नदीत बुडून वृद्धाचा मृत्यू   | पुढारी

छत्रपती संभाजीनगर: शिवना नदीत बुडून वृद्धाचा मृत्यू  

हतनूर; पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील टापरगावजवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्गवरील पुलाजवळील शिवना नदीच्या पात्रात बुडून वृद्धाचा मृत्यू झाला. शिवाजी रायभान गायकवाड (वय ७७, रा. गल्लेबोरगाव, ता. खुलताबाद) असे मृत वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटनास्थळी दाखल होत पोलीस काँन्स्टेबल कैलास करवंदे, संजय आटोळे, पोलीस मित्र संतोष ढोले यांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. त्यानंतर हतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. हेमंत गावंडे यांनी शवविच्छेदन केले.

हेही वाचा

Back to top button