अल्पसंख्यांक वस्ती विकासासाठी ७५ लाखांचा निधी मंजूर: विनय कोरे | पुढारी

अल्पसंख्यांक वस्ती विकासासाठी ७५ लाखांचा निधी मंजूर: विनय कोरे

बांबवडे : पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी – पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रातील मूलभूत पायाभूत सुविधांसाठी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.

आ. कोरे म्हणाले, ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक समाजाचा जीवनमान दर्जा उंचावण्याच्या उद्देशाने अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रासाठी मूलभूत, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातील ७ अल्पसंख्याक वस्ती विकासासाठी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

शाहूवाडी तालुक्यातील कडवे येथे मुस्लिम वस्तीमध्ये सोयी सुविधा करणे (१५ लाख), वालूर येथे मुस्लिम वस्तीमध्ये सोयी सुविधा करणे (१५ लाख), येळवण जुगाई येथे मुस्लिम वस्तीमध्ये सोयी सुविधा करणे (५ लाख), ऐनवाडी येथे मुस्लिम वस्तीमध्ये सोयी सुविधा करणे (५ लाख), अणूस्कुरा येथे मुस्लिम वस्तीमध्ये सोयी सुविधा करणे (१० लाख), पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे मुस्लिम वस्तीमध्ये सोयी सुविधा करणे (१५ लाख), पोखले येथे मुस्लिम वस्तीमध्ये सोयी सुविधा करणे (१० लाख) अशा एकूण ७५ लाख रुपयांच्या निधीला शासनाने मान्यता दिल्याचे आमदार कोरे यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button