औरंगाबाद : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक जखमी | पुढारी

औरंगाबाद : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक जखमी

अजिठा; पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद – जळगाव महामार्गावरील बाळापूर बस स्टँड जवळील काही अंतरावर अज्ञात वाहनाच्या घडकेत दुचाकीस्वार ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना आज (शनिवार) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. शमशुद्दीन जहीरुद्दीन (वय ४४, रा. अजिठा ता. सिल्लोड) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्‍तीचे नाव असून, सय्यद शाहरुख सय्यद आलम (२५, रा. अजिठा, ता. सिल्लोड) हा गंभीर जखमी झाला आहे़.

याबाबत अधिक माहिती अशी की, अजिंठा येथील शेख शमशुदीन आणि सय्यद शारुख हे दोघे दुचाकीवरून डिग्रस गावी जात होते. यावेळी सिल्लोड तालुक्यातील बाळापूर जवळ अज्ञात वाहनाने त्‍यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील शेख शमशुद्दीन (वय ४४ ) रा. अजिठा ता. सिल्लोड हा जागीच ठार झाला. तर सय्यद शाहरुख सय्यद आलम (वय २५ ) रा. अजिठा ता. सिल्लोड हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : 

Back to top button