मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्र पोलिसांच्या नावाला बट्टा लावला : देवेंद्र फडणवीस ; बदल्या आणि पोस्टिंगबाबत सुनावले खडेबोल | पुढारी

मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्र पोलिसांच्या नावाला बट्टा लावला : देवेंद्र फडणवीस ; बदल्या आणि पोस्टिंगबाबत सुनावले खडेबोल

पुणे; पुढारी वृत्तसेवा :मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्र पोलिसांच्या नावाला काही लोकांनी बट्टा लावला. बदललेल्या सत्तंतरात बदल्या आणि पोस्टिंगसाठी कोणालाही भ्रष्टाचाराला समोर जावं लागणार नाही. गेल्या काही दिवसात आम्ही तशा बदल्या देखील केल्या आहेत. त्यामुळे खालील अधिकाऱ्याकडून देखील तीच अपेक्षा आहे. असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक गुन्हेगारी आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बैठकीला राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते.

Back to top button