खासदार हेमंत गोडसे : नासाकाकडून 582. 87 लाख ऊसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग | पुढारी

खासदार हेमंत गोडसे : नासाकाकडून 582. 87 लाख ऊसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

नाशिक सहकारी साखर कारखाना संचलित दीपक बिल्डर अँड डेव्हलपर्सच्या वतीने ऊस गळीत हंगाम 2022-23 मधील ऊसासाठी प्रति मे टन रुपये 2401प्रमाणे पहिल्या पंधरवड्यात दि. 31 नोव्हेंबर पर्यंत गळीतास आलेल्या उसाचे 310.06 लाख व दुसऱ्या पंधरवड्यात 15 डिसेंबर पर्यन्त गळीतास आलेल्या ऊसाचे 272.81 लाख असे दोन्ही पंधरवड्याचे एकूण रक्कम रुपये 582.87 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

नऊ वर्षानंतर सुरू झालेला नाशिक सहकारी साखर कारखाना सुरुवातीला काहीशा तांत्रिक अडचणीतून जात असताना कमी गाळपा अभावी शेतकऱ्यांच्या ऊस तोडीमध्ये अनियंत्रता निर्माण झाली होती. मात्र त्यावर प्रशासनाने मात केली असून कारखाना दि. 21 नोव्हेंबर रोजी सुरू होऊन दिनांक 27 डिसेंबर अखेर कारखान्याने 31670 मे टन उसाचे गाळप करून 24500 किंटल साखरेचे उत्पादन केलेले आहे. दिनांक 15 डिसेंबर अखेर कारखान्याने 24279 मे टन उसाचे गाळप करून गाळप झालेल्या उसास रक्कम रुपये 2401/- प्रति मे टना प्रमाणे रक्कम रुपये 272.81 लाख दिनांक 28 डिसेंबर रोजी ऊस उत्पादक पुरवठा शेतकऱ्यांचे बँक खात्यावर वर्ग केले आहे तसेच 30 नोव्हेंबर पर्यंत गाळप झालेल्या उसाचे पेमेंट यापूर्वीच रक्कम रुपये 310.06 लाख सबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे खात्यावर वर्ग केलेले आहे, असे दोन्ही पंधरवड्याचे एकत्रित रक्कम रुपये 582.87 लाख ऊस पेमेंट ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे खात्यावर वर्ग केलेले असून संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 29 डिसेंबर पासून आपापले बॅंकेतून पेमेंट मिळेल तसेच कारखान्याने ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना वेळेवर ऊस पेमेंट करून आर्थिक सहकार्य केलेले आहे, असेच सहकार्य शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा करून सुरू ठेवण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन खासदार हेमंत गोडसे संचालक दीपक चांदे, शेरझाद पटेल, सागर गोडसे कार्यकारी संचालक सुखदेव शेटे यांनी केले आहे.

हेही वाचा:

Back to top button