राज्यातील तीन साहित्यिकांना युवा साहित्य पुरस्कार प्रदान | पुढारी

 राज्यातील तीन साहित्यिकांना युवा साहित्य पुरस्कार प्रदान

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : महाराष्ट्रातील तीन युवा साहित्यिकांना क्रमशः मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीच्या प्रतिषि्ठत युवा साहित्य पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. कार्यक्रमात एकूण 24 भाषांसाठी युवा साहित्यिकांना वर्ष 2022 चे साहित्य पुरस्कार देण्यात आले. साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक तसेच प्रसिद्ध साहित्यिक ममता कालिया यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

मराठी भाषेसाठी युवा साहित्यिक पवन नालट यांना ‘मी संदर्भ पोखरतोय‘ या काव्य संग्रहासाठी पुरस्कार देण्यात आला. नालट हे मूळचे अमरावतीचे असून ते शिक्षक आहेत. त्यांच्या याच कविता संग्रहाला के. बी. निकुंब काव्यसंग्रह पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा नवोदित साहित्य लेखन पुरस्कार तसेच किसनराव पाटील वाड्ःमय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. ‘श्रीमतीचरित्रम‘ या संस्कृत काव्य संग्रहासाठी श्रुती कानिटकर यांना  गौरविण्यात आले. कानिटकर या आयआयटी मुंबईमध्ये सहाय्यक प्राध्यापिका आहेत. त्या वेदांतमध्ये पीएचडी करीत आहेत. ‘गिरयाह‘ गझल संग्रहासाठी मकसूद आफाक यांना पुरस्कार देण्यात आला. मकसूद हे मुंबईत शिक्षक आहेत.

हेही वाचा

Back to top button