

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाला हादरवून सोडणार्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील ( Shraddha Walker Murder case ) खुनी आफताब अमीन पूनावाला ( वय २९ ) याने पोलिस चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तो अमेरिकेतील टीव्ही मालिका 'सायकोलॉजिकल थ्रिलर Dexter'चा फॅन होता. लहानपणी त्याने हा शो पाहिला होता. त्याने लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरचा थंड डोक्याने गळा दाबून खून केला. त्यानंतर या मालिकेत दाखवल्याप्रमाणे तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. ते फ्रिजमध्ये ठेवले. पुढील १८ दिवस तो दररोज मध्यरात्री दोन तुकडे दिल्ली नजीकच्या मेहरोलीच्या जंगलात फेकून देत होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
वसईत राहणार्या आफताब पूनावाला याची वसईतीच राहणार्या २६ वर्षीय श्रद्धा वालकरसोबत ओळख झाली. श्रद्धा मुंबईत एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र दोघांच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. त्यामुळे दोघेही दिल्लीला पळून गेले. दिल्लीतील छतरपूर परिसरात त्यांनी फ्लॅट भाड्याने घेतला.
सायकोलॉजिकल थ्रिलर Dexter हा अमेरिकेतील गुन्हेगारी विषयी टीव्ही शो होता. २००६ ते १०१३ या काळात तो दाखवला गेला. या मालिकेचे एकूण ८ सीजन आले होते. या मालिकेतील प्रमुख पात्र असणारा डेक्स्टर मॉर्गन हा दिवसभर पोलिसांसाठी एका प्रयोगशाळेत फॉरेसिंक टेक्निशयन म्हणून काम करत असतो. तोच रात्री सीरियल कलर बनतो. मॉर्गन हा अत्यंत थंड डोक्याने आणि कोणाताही पुरावा न ठेवता खून करत असतो, असे या मालिकेमध्ये दाखविण्यात आले होते. या मालिकेचा प्रभाव आफताब याच्यावर होता, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
आफताब याने १८ मे २०२२ रोजी श्रृद्धाचा गळा दाबून खून केला. यानंतर तो घाबरला. यावेळी त्याला लहानपणी पाहिलेल्या सायकोलॉजिकल थ्रिलर Dexterची आठवण आली. त्याने श्रृद्धाचा मृतदेह बाथरुममध्ये ठेवला. दुसर्या दिवशी त्याने फ्रिज विकत घेतला. यानंतर १९ मेपासून सायकोलॉजिकल थ्रिलर Dexter मालिकेत दाखवल्याप्रमाणे तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. ते फ्रिजमध्ये ठेवले. पुढील १८ दिवस तो दररोज मध्यरात्री दोन तुकडे दिल्ली नजीकच्या मेहरोलीच्या जंगलात फेकून देत होता. अनेकांनी त्याला मध्यरात्री जंगलात हटकले होते. रात्री जंगलात काय करतोस? अशी विचारणा केली होती. यावेळी त्याने उडावीउडवीची उत्तरे देत वेळ मारुन नेली होती.
श्रद्धाचा खून झाल्याचे कोणाचाही लक्षात येवू नये यासाठी आफताबने २५ मेपर्यंत तिच्या इंस्टाग्राम अकांउटवर मेसज टाकत होता. श्रद्धाच्या मित्र आणि मैत्रीणींना तो मेसज पाठवत राहिला. तिला कोणी मेसज पाठवला तर तो उत्तरही देत होता. १० जूननंतर त्याने श्रद्धाचा मोबाईल फोन बंद केला. यानंतर श्रद्धाच्या मित्र आणि मैत्रीणींना तिची काळजी वाटू लागली. त्यांनी तिच्या पालकांशी संपर्क केला.
मे २०२२ नंतर आपला मुलीशी संपर्क झालेला नाही. मुलीचे अपहरण झाले आहे, अशी तक्रार श्रद्धाचे वडील विकास मदन यांनी दिल्लीत मेहरौली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करता धक्कादायक माहिती समोर आली.
श्रद्धाचा खून केल्यानंतर आफताबने दिल्लीत एका तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण केले. श्रद्धाचा खून केल्यानंतर ती तरुणी आफताबच्या फ्लॅटवर त्याला भेटायला येत होती. मात्र आफताबच्या भयंकर गुन्हयाबाबत तिला माहिती नव्हती. आफताब याने श्रद्धाचा खून करुन १८ दिवसांमध्ये मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर त्याने फ्लॅट बदलला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी दक्षिण दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अंकित चौहान यांनी सांगितले की, "आफताबने ज्या खोलीत श्रद्धाचा गळा दाबून खून केला येथेच त्याने मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठवले होते. सलग १८ दिवस त्याने जंगलात विविध ठिकाणी मृतदेहाचे तुकडे टाकले. या ठिकाणी पोलिसांनी आज ( दि. १५) आफताबला घेवून गेले. येथे पाहणी करुन मृतदेहाचे तुकडे गोळा करण्याचे काम सुरु केले आहे. आफताब सांगत असलेल्या ठिकाणी पाहणी सुरु असून आतापर्यत १० तुकडे ताब्यात घेण्यात आले आहेत." दरम्यान आफताबच्या संपर्कात असणार्या तरुणींचा पोलीस शोध घेत आहेत. या तरुणींशी असणार्या संबंधामधून श्रद्धाचा खून करण्यात आला आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा :