नाशिक : कझाकिस्तानमध्ये गुंजणार बासरीवादक अनिल कुटे यांचे सूर | पुढारी

नाशिक : कझाकिस्तानमध्ये गुंजणार बासरीवादक अनिल कुटे यांचे सूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथील सुप्रसिद्ध बासरीवादक अनिल कुटे हे कझाकिस्तानमध्ये होत असलेल्या बासरीवादन कार्यशाळेस उपस्थित राहणार असून, शुक्रवार (दि.14)पासून दहा दिवस ते या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. तसेच ते अलमाटी या शहरात दोन स्टेज शो करणार असून, एकूण 56 विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. एका मुस्लीम देशात हिंदुस्थानी संगीताची कार्यशाळा घेण्याचा मान प्रथम अनिल कुटे यांना मिळाला आहे. बासरीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ते मेहनत घेत असून, देश- विदेशात त्यांनी अनेक शिष्य घडविले आहेत.

हेही वाचा:

Back to top button