औरंगाबाद : शिवसैनिकांचा मशाल चिन्ह मिळाल्यानंतर जल्लोष | पुढारी

औरंगाबाद : शिवसैनिकांचा मशाल चिन्ह मिळाल्यानंतर जल्लोष

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने धगधगती मशाल हे चिन्ह दिल्यानंतर औरंगाबाद येथे कार्यकर्त्यांनी मशाल पेटवून जल्लोष केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

शिवसेनेला मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव ठाकरे गटाला सोमवारी (दि. १०) निवडणूक आयोगाने जाहीर केले. त्यानंतर ठाकरे गटांच्या कार्यकर्यांनी अनेक ठिकाणी जल्लोष केला. क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मशाल पेटवून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. माजी महापौर नंदकुमार घोडले, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, राजेंद्र दानवे यांनीही यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

हेही वाचा :

Back to top button