इस्लामपूर : पेठनाका येथे संशयास्पद मृतदेह आढळला; बेळगावच्या तरुणाचा मृतदेह असल्याचे स्पष्ट | पुढारी

इस्लामपूर : पेठनाका येथे संशयास्पद मृतदेह आढळला; बेळगावच्या तरुणाचा मृतदेह असल्याचे स्पष्ट

इस्लामपूर ः पुढारी वृत्तसेवा पुणे-बेंगळूर महामार्गावर पेठनाका येथे गुरुवारी सकाळी एका कारमध्ये तरुणाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला. मृतदेह सडल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. हा मृतदेह शिवानंद निरंजन बोरगले (रा. बेळगाव) याचा असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. मात्र त्याचा मृत्यू कशाने झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी सकाळी पेठनाका येथे महामार्गालगत दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. महामार्गालगत असलेल्या कारमध्ये (एम.एच.20/ईवाय-1383) एका 30 ते 35 वयाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृत्यू चार ते पाच दिवसापूर्वी झाला असल्याने तो पूर्णपणे सडला होता.

दरम्यान, हा मृतदेह शिवानंद बोरगले (रा. बेळगाव) याचा असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. तो येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडे कामाला होता. गेल्या सात-आठ दिवसापूर्वी तो गावी जातो म्हणून गेला होता. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी जयवंत पाटील (रा. पेठ) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Back to top button