नााशिक : मनपा आयुक्तांच्या हस्ते उद्या जलपूजन | पुढारी

नााशिक : मनपा आयुक्तांच्या हस्ते उद्या जलपूजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरण समूहात 98 टक्के इतका पाणीसाठा आहे. त्यानुसार आता महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सोमवारी (दि. 29) दुपारी 12 वाजता जलपूजन होणार आहे. सध्या प्रशासकीय राजवट लागू असल्याने महापौरांऐवजी प्रथमच आयुक्तांच्या हस्ते जलपूजन होणार आहे.

नाशिकला जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्येच संततधार पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट दूर झाले आहे. या संततधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणही पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणात 92 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा ठेवता येत नसल्याने गेल्या एक महिन्यापासून नदीपात्रातून जायकवाडीकडे विसर्ग केला जात आहे. सध्या पावसाने दोन दिवसांपासून विश्रांती घेतल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जलसाठ्यांचे पूजन करण्याची परंपरा आहे, त्यानुसार दरवर्षी महापौर, उपमहापौर तसेच सर्वपक्षीय गटनेत्यांच्या उपस्थितीत जलपूजन केले जाते. पाणीपुरवठा विभागातर्फे जलपूजनाचे आयोजन केले जाते. यंदा मात्र लोकप्रतिनिधींऐवजी प्रशासकीय राजवट असल्याने महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना जलपूजनाचा मान मिळाला आहे.

धरणातील पाणीसाठा (दशलक्ष घनफूटमध्ये) : 

गंगापूर धरण समूह
गंगापूर धरण- 5,074
कश्यपी – 1,158
गौतमी – 1,341
एकूण – 7,573 (96.22)

दारणा – 6,350
मुकणे – 4,211

हेही वाचा:

Back to top button