पुणे अजूनही पावसात उणेच | पुढारी

पुणे अजूनही पावसात उणेच

पुणे : राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असताना पुणे शहर परिसर व जिल्ह्यात मात्र अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. हवामान विभाग दर आठवड्याचा, पंधरा दिवसांचा व महिन्याचा नकाशा प्रकाशित करतो. यात जूनपर्यंत लाल व राखाडी रंगात दिसणारा महाराष्ट्र आता हिरवागार दिसत आहे, तर काही भाग चांगल्या पावसाचे म्हणजे निळ्या रंगात दिसत आहेत. यात पुणे जिल्हा अजूनही लाल रंगात म्हणजे अत्यल्प पावसाच्या जिल्ह्यांच्या यादीत आहे.

पुणे जिल्हा आहे अजूनही रेड झोनमध्ये…

नकाशात राज्यातील बहुतांश जिल्हे हिरव्या रंगात आहेत. त्याचा अर्थ सर्वत्र सरासरी 19 टक्के पाऊस झाला आहे. आकाशी रंगात बीड, परभणी, नांदेड, लातूर येथेच 1 जून ते 6 जुलै या कालावधीत मुसळधार पाऊस झाला आहे. प्रत्येक जिल्ह्याची वार्षिक सरासरी किंवा त्या महिन्याची सरासरी ठरलेली असते. त्यावरून हा तक्ता केलेला आहे. या नकाशात पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नंदुरबार, वाशिम, यवतमाळ, हिंगोली हे आठ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. यात पुणे जिल्ह्यात उणे 31 टक्के पाऊस झाल्याचे दिसत आहे.

या रंगांचे अर्थ काय?

  • लाल रंग : अत्यल्प पाऊस (उणे 20 ते उणे 59 टक्के)
  • आकाशी रंग : मुसळधार पाऊस (20 ते 59 टक्के पाऊस)
  • हिरवा रंग : साधारण पाऊस (19 ते उणे 19 टक्के पाऊस)
  • पिवळा रंग : कमी पाऊस (उणे 60 ते उणे 99 टक्के पाऊस)
  • राखाडी रंग : (एकही थेंब पाऊस नाही, उणे 100 टक्के)
  • गडद निळा : अतिमुसळधार (60 टक्के व अधिक)

Back to top button