सातारा : कराडजवळील डेळेवाडीनजीक कोसळली दरड | पुढारी

सातारा : कराडजवळील डेळेवाडीनजीक कोसळली दरड

ढेबेवाडी ; पुढारी वृत्तसेवा उंडाळे आणि ढेबेवाडी खोऱ्यासह तांबवे विभाग जोडणारा उंडाळे-तांबवे ते पाटण मार्गे कोकणात जोडणाऱ्या रस्त्यावरील डेळेवाडी (ता. कराड) येथील बुवासाहेब खिंड येथे दरड कोसळली. यामुळे या मार्गाने उंडाळेसह चांदोली खोरे व ढेबेवाडीसह पाटण व कोकण विभागाचा संपर्क तुटला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कराड दक्षिणला सर्व बाजूने जोडणारे रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे काम माजी मंत्री स्व. विलासराव पाटील यांनी केले. त्यापैकीच चांदोली खोरे व कोकण विभाग जोडणारा उंडाळे – कोळेवाडी – तांबवे – तांबवे मार्गे पाटण व पुढे चिपळूण मार्गे कोकणला जोडणारा मार्ग.

या मार्गावर तुळसण खिंड व डेळेवाडी येथील बुवासाहेबाची खिंड या दोन ठिकाणी वाहतूक काहीशी अवघड व धोकादायक होती. म्हणून या मार्गावरील वळणे रूंदावून रहदारी सुलभ करून घेतली होती. बुवासाहेब खिंड ही अत्यंत रहदारीसाठी धोकादायक होती. ही बाब लक्षात घेऊन उंच डोंगर फोंडून तयार करून धोका कमी करण्यात आला आहे. त्याच ठिकाणी रविवारी रात्री दरड कोसळली व ढिगारा रस्त्यावर पडल्याने रहदारी बंद पडली. यामुळे चांदोली खोरे, उंडाळे व ढेबेवाडी खोऱ्यासह कोकण विभाग संपर्कहीन झाला आहे. तातडीने या खिंडीतील ढिगारे उपसून रस्ता रहदारीसाठी खुला करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button