PM नरेंद्र मोदी यांनी काश्मिरी पंडितांची माफी मागावी : नाना पटोले | पुढारी

PM नरेंद्र मोदी यांनी काश्मिरी पंडितांची माफी मागावी : नाना पटोले

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. तसेच त्‍यांनी कितीही घोडेबाजार केला तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. अगामी राज्यसभा निवडणूकीत चारही उमेदवार हे महाविकास आघाडीचे असतील असा विश्वास माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

नाना पटोले बोलताना म्‍हणाले की, मुस्लिम देशांतून निषेध सुरू झाला आहे. तसेच भारतीय वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन दिल्‍याने भाजपाने नाईलाजाने त्‍यांचे दोन प्रवक्त्यांना निलंबित केले, असा आरोप पटोलेंनी केला. भाजप हा संविधानाला न मानणारा पक्ष आहे, असे आम्ही वारंवार सांगितले आहे. संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्य दिले असले तरी दुसऱ्याच्या धर्मावर टीका करण्याचा अधिकारी दिलेला नाही. केवळ भाजपमुळे जागतिक स्तरावर भारताची मान खाली गेली आहे.

भाजपकडून कलम ३७० हटवण्याबाबत सांगण्यात आले होते. परंतु कलम हटविल्यावर आज तेथील परिस्थिती ही अत्‍यंत वाईट होत आहे. तर काश्मिरी पंडितांची तेथे हत्त्या करण्यात झाले आहेत. अद्यापर्यंत त्‍या परिसरात राष्ट्रपती राजवट असून तिथे निवडणुका घेऊ शकत नाही. तर भाजपाने काश्मिरी पंडितांच्या जीवावर राजकारण केले आहे आणि त्‍यांच्या जीवावर पोळया भाजण्याचे काम भाजपने करत आहे. परंतु यातून ते संरक्षण करू शकत नाही, अशी टीका पटोले यांनी केली. तसेच नरेंद्र मोदी यांनी काश्मिरी पंडितांची माफी मागावी, असेही आवाहन पटोले यांनी केले.

हेही वाचा  

Back to top button