जालना : ट्रकच्या धडकेत सेवानिवृत्त मंडळ अधिकारी जागीच ठार | पुढारी

जालना : ट्रकच्या धडकेत सेवानिवृत्त मंडळ अधिकारी जागीच ठार

विरेगाव: पुढारी वृत्तसेवा : ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत सेवानिवृत्त मंडळ अधिकारी यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. ६) रात्री घडली. शेख फतरु शेख बाबा (वय ७२) असे मृत सेवानिवृत्त मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे. ट्रक चालक फरार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जालना तालुक्यातील विरेगाव येथे जालना – मंठा महामार्गावर सोमवारी रात्री १० च्या सुमारास जालन्याकडून सळई घेऊन ट्रक (क्रमांक एम एच 43 ई 2506) मंठ्याकडे जात होता. यावेळी ट्रकने शेतातून दुचाकीवरुन घरी जात असलेल्या शेख यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात शेख यांचा जागीच मृत्यू झाला.

ट्रक चालकाविरुद्ध मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास पोलीस सहायक निरीक्षक विलास मोरे करत आहेत. या घटनेमुळे शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button