सासर्‍याचा खून करून पसार झालेला आरोपी जेरबंद मावळातील कुरवंडे येथील घटना | पुढारी

सासर्‍याचा खून करून पसार झालेला आरोपी जेरबंद मावळातील कुरवंडे येथील घटना

लोणावळा : मूळ गावी राहण्यासाठी जाण्याच्या कारणास्तव पती आणि पत्नी यांच्यामध्ये झालेल्या वादातून पतीने धारदार कोयत्याने सासरा आणि पत्नीवर वार केले. यामध्ये सासर्‍याचा जागीच मृत्यू झाला असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवारी 5 जून रोजी रात्री उशिरा घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा शहर पोलिसांनी अवघ्या चार तासांतच आरोपीला ताब्यात घेत जेरबंद केले आहे.

संतोष पांडू वाघमारे (45, रा. कातकरीवस्ती, आंबेनळी, कुरवंडे, मावळ) असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सासर्‍याचे नाव आहे. तर मनिषा संतोष वाघमारे (26, रा. कातकरीवस्ती, मावळ) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. या खूनप्रकरणी संतोष नथू वाघमारे (30, सध्या रा. कातकरीवस्ती, आंबेनळी, कुरवंडे, मावळ, मूळ रा. माणगाव, महाड़, रायगड) याला अटक करण्यात आले आहे.

निमगाव केतकी: कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत इंदापूरमधील २३ वर्षीय युवक ठार

याप्रकरणी आरोपीची पत्नी मनिषा हिने लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार संतोष आणि मनिषा हे पती-पत्नी असून, ते लग्नानंतर मनिषाच्या माहेरी लोणावळ्याजवळील कातकरी वस्तीत राहत होते. संतोष हा मूळचा रायगड जिल्ह्यातील माणगावचा रहिवासी आहे. संतोष हा पत्नी मनिषाला आपल्या गाववी राहायला चल असे वारंवार सांगत होता.

मात्र मनिषा आणि तिचे वडील वाघमारे यांनी सासरी जाण्यास नकार दिला. यावरून सासरा व जावई यांच्यात वाद झाला. त्यामुळे संतोषने सासर्‍यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत रागाच्या भरात सासरा संतोष वाघमारे यांच्या मानेवर धारदार कोयत्याने वार केले. या हल्ल्यात सासरा संतोष वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी मनिषा हिच्यावर कोयत्याने वार केल्याने या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. जखमी मनिषा हिच्यावर पनवेल येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नगर-औरंगाबाद मार्गावर कंटेनरने मुलाला चिरडले, आई गंभीर जखमी; रुग्णालयात दाखल

या घटनेची माहिती मिळताच लोणावळा उपविभागीय प्रभारी पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, लोणावळा शहर पोलिस निरीक्षक सिताराम डुबल, स.पो.नि. संदेश बावकर, महिला पो.उप.नि. सुरेखा शिंदे, यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेत केवळ चार तासांतच त्याला जंगलातून ताब्यात घेत जेरबंद केले आहे.

Back to top button